महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये- Essay on Mahatma Gandhi in Marathi

In this article, we are providing information about Mahatma Gandhi in Marathi- Short Essay on Mahatma Gandhi in Marathi Language. महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये, Mahatma Gandhi Nibandh Marathi Madhe for class 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 students.

महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये- Essay on Mahatma Gandhi in Marathi

 

Marathi Essay on Mahatma Gandhi ( 100 words )

महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय नेते होते. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो.

महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. ते खूप शिकले. पण त्यांनी नोकरी केली नाही. त्यांनी वकिलीही केली नाही. ते आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले.

महात्मा गांधींची राहणी अगदी साधी होती. ते गरीब भारतीय माणसासारखे राहत. ते खादीचे धोतर वापरत. ते नेहमी सत्य बोलत. त्यांना अन्याय खपत नसे. ते अन्यायाविरुद्ध लढत.

त्या काळात भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतीयांवर जुलूम करत, अन्याय करत. गांधीजी इंग्रजांविरुद्ध अहिंसेने लढले. त्यांनी इंग्रजांना ‘चले जाव’ असे ठणकावले.

गांधीजींना भारतीय प्रेमाने ‘बापू’ म्हणत. संपूर्ण भारत त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानतो.

Read Also-

Essay on Mahatma Gandhi in Sanskrit

Essay on Mahatma Gandhi in Hindi

 

Mahatma Gandhi Marathi Nibandh ( 200 words )

महात्मा गांधी खरोखरच एक महान नेते होते. कधीही कोणत्याही सत्तापदाची अभिलाषा न बाळगता ते आपल्या देशवासीयांसाठी कष्टत राहिले.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. बॅरिस्टर झालेले गांधीजी आफ्रिकेला वकिली करायला गेले. पण तेथे असणाऱ्या भारतीयांची छळवणूक पाहून ते त्यांचे मार्गदर्शक पुढारी झाले. पुढे गांधीजींनी आपले सारे जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेचले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे गुरू. त्यांच्या सांगण्यानुसार आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. पारतंत्र्यातील आपल्या देशवासीयांची दैनावस्था पाहिली. त्यांनी शक्तिमान इंग्रज सरकारशी निःशस्त्र भारतीयांचा लढा उभारायचे ठरवले. गांधीजींनी लोकांना अहिंसा व सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. गरीब लोकांना त्यांनी चरखा व टकळी देऊन स्वदेशीचे महत्त्व पटवले.

सर्व भारतीयांत महात्मा गांधीजींनी राष्ट्रप्रेमाची भावना फुलवली. त्यांनी लोकांना सांगितले की, ‘प्रेम’ व ‘मानवता’ हेच श्रेष्ठ धर्म आहेत. त्यांनी सर्व भारतीयांना एका झेंड्याखाली आणले. शेवटी इंग्रज सरकारला भारताचे स्वातंत्र्य दयायला भाग पाडले. भारत स्वतंत्र झाला.

लोकांनी त्यांना आपले ‘बापू’ म्हणजे पिता मानले. जगाने त्यांना ‘महात्मा’ ठरवले. इतिहासकारांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवले.

 

Mahatma Gandhi Essay in Marathi ( 300 words )

महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते . महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला . महात्मा गांधींना बापू या नावाने देखील ओळखले जात असे . महात्मा गांधींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई होते ‌. महात्मा गांधी हे लहानपणापासूनच शांत स्वभावाचे होते . महात्मा गांधी‌ शाकाहारी होते . महात्मा गांधींनी त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदर आणि राजकोट मध्ये पूर्ण केले . वयाच्या १३ व्या वर्षी महात्मा गांधींचा कस्तुरबा गांधी यांच्या सोबत विवाह झाला .

महात्मा गांधींनी त्यांचे बॅरिस्टर चे शिक्षण लंडन येथे पुर्ण केले . सन १८९१ मध्ये गांधीजी त्यांचे शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले . भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी राजकोट येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली . वकिली व्यवसाय करत असताना महात्मा गांधींना भारतातील जनतेचे इंग्रजांमुळे झालेल्या वाईट परिस्थितीचे चित्र बघायला भेटले . महात्मा गांधींनी भारतातील जनतेला एकत्र आणण्याचे ठरवले . भारतामध्ये राहणारे वेगवेगळ्या धर्माचे , पंथाचे लोक एकत्र आले . महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना चार पुत्र झाली .

महात्मा गांधी हे नेहमी लोकांना सत्याच्या मार्गावर जाण्यास सांगत असत . महात्मा गांधींनी १९३० मध्ये दांडी यात्रा सुरू केली . दांडी यात्रेमध्ये असंख्य लोकांनी सहभाग घेतला . याचा देखील इंग्रजांवर परिणाम झाला.‌ महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर भारत छोडो‌ आंदोलन , चंपारण सत्याग्रह , असहयोग आंदोलन , हरिजन आंदोलन , मिठाचा सत्याग्रह अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी शाळा आणि दवाखाने उभारले .

महात्मा गांधींना खुप वेळा तुरुंगवास भोगावा लागला तरीदेखील त्यांनी कधीच हार मानली नाही . महात्मा गांधींनी आपला लढा चालूच ठेवला . महात्मा गांधींनी इंग्रजांना ” चले जाव ” आणि ” भारत छोडो ” या घोषणा दिल्या.‌ १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि महात्मा गांधींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण झाले. ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींचे निधन झाले . महात्मा गांधींनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधी यांना ” महात्मा ” असे संबोधित केले . सुभाषचंद्र बोस यांनी देखील महात्मा गांधींचा ” राष्ट्रपिता ” असा उल्लेख केला.

 

ध्यान दें– प्रिय दर्शकों Essay on Mahatma Gandhi in Marathi (Article)आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करे

इस लेख के माध्यम से हमने Marathi Mahatma Gandhi Nibandh |  Mahatma Gandhi Nibandh Marathi का वर्णन किया है और आप यह निबंध नीचे दिए गए विषयों पर भी इस्तेमाल कर सकते है।

Mahatma Gandhi nibandh Marathi
Mahatma Gandhi par Marathi essay
Marathi Mahatma Gandhi par nibandh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *