शिवाजी महाराज निबंध मराठी- Essay on Shivaji Maharaj in Marathi

In this article, we are providing information about Shivaji Maharaj in Marathi- Short Essay on Shivaji Maharaj in Marathi Language. महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये, Shivaji Maharaj Nibandh Marathi for class 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 students.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी- Essay on Shivaji Maharaj in Marathi

 

Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi for kids ( 150 words )

राजा शिवछत्रपती हे खरोखरच आदर्श राजे होते ! ते शूर होते; शिस्तप्रिय होते; सदाचारी होते. ते अत्यंत चारित्र्यवान राजे होते.

शिवरायांच्या बालपणी महाराष्ट्रातील जनता रंजली-गांजलेली होती. शूर पराक्रमी मराठे सरदार परक्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. कोणाच्याही मनात स्वराज्याचे विचार येत नव्हते. अशा वेळी बाल शिवरायांच्या मनात त्यांची आई जिजाईमाता आणि गुरू दादोजी कोंडदेव यांनी स्वराज्याची कल्पना फुलवली.

मग शिवाजीराजांनी आपल्या भोवतालच्या मावळ प्रदेशातून शूर मित्र मिळवले; त्यांना लढाईचे शिक्षण दिले आणि एका पाठोपाठ एक गड जिंकायला सुरवात केली. स्थानिक जनतेला स्वास्थ्य, सुरक्षितता मिळवून दिली. त्यांच्या मनात ‘स्वराज्याची’ कल्पना रुजवली. मराठ्यांचे राज्य साकार होऊ लागले.

निजामशहा, आदिलशहा, मोंगलसत्ता यांच्याशी लढे देताना शिवरायांनी गनिमी काव्याचा अवलंब केला. त्यांना अफजलखान, शाहिस्तेखान अशा मोंगल सरदारांशी तोंड दयावे लागले. लोकाग्रहाखातर राजांनी राज्याभिषेक करवून घेतला. पण ते राज्य ते स्वत:चे मानत नव्हते, तर हे राज्य श्रींचे आहे असे ते मानत.

शिवाजीराजे जनतेवर जीवापाड प्रेम करत. जनतेवर अन्याय-अत्याचार होऊ नये म्हणून काळजी घेत. राजांची शिस्त कडक होती. अष्टप्रधानमंडळ नेमन त्यांनी राज्यकारभाराची चोख व्यवस्था केली. असा हा जनतेचा खराखुरा राजा होता.

Read Also-

Essay on Mahatma Gandhi in Marathi

 

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी- Shivaji Maharaj Nibandh Marathi Madhe ( 300 words )

शिवाजी महाराज हे खुप मोठे राजे होते . शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी भोसले होते . शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडीलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते . शिवाजी महाराजांचा जन्म इ.स १६२७ साली झाला . शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला . शिवाजी महाराज लहान असताना जिजाबाई त्यांना शुर पुरुषांच्या गोष्टी सांगत असत . शिवाजी महाराजांना लहानपणीच गनिमी कावा , तलवार चालवणे , न्यायशास्त्र , घोडेस्वारी , युद्धशास्त्र , नितीबाबत अशाप्रकारचे शिक्षण देण्यात आले .

शिवाजी महाराजांना अन्यायाची खुप चीड होती . शिवाजी महाराजांनी लहान वयातच आपली जबाबदारी समजावून घेऊन स्वराज्यासाठी कार्य केले . शिवाजी महाराजांचे वयाच्या १० व्या वर्षी सईबाईं सोबत लग्न झाले . यांच्या मुलाचे नाव संभाजी होते . संभाजी शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते . शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी होत्या . शिवाजी महाराजांना मराठी साम्राज्याचे संस्थापक या नावानेही ओळखले जाते .

शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली . शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी लढताना कधीही आपल्या प्राणांची काळजी केली नाही . शिवरायांची आपल्या मावळ्यांसोबतची वागणूक नेहमी प्रेमळ होती . शिवाजी महाराज ऊन , वारा , पाऊस कशाचीही चिंता न करता आपल्या स्वराज्यासाठी नेहमी लढले .सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्यावर हल्ला केला .

सन १६५९ मध्ये अफजलखानने‌ शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला . शिवाजी महाराजांनी अफजल खानला भेटायला जाताना आपल्या बोटांमध्ये वाघाची नखे , बिचवा आणि अंगात चिलखत घालून ठेवले . अफजल खानने शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला . कारण शिवाजी महाराजांनी अंगात चिलखत घातले होते . शिवाजी महाराजांनी वाघनखांनी आणि बिचव्यानी अफजलखानावर हल्ला केला आणि अफजलखानचा जागच्या जागी मृत्यु झाला .

सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचे साम्राज्य खुप वाढले होते . ४ ऑक्टोबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्यभिषेक करण्यात आला . या वेळी हिंदू स्वराज्य स्थापनेची घोषणा केली गेली . यापुढे शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या आणि सहकार्यांच्या सोबत मराठा साम्राज्य निर्माण केले आणि शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती झाले . शिवाजी महाराजांचे वयाच्या चाळीसाव्या वर्षी ३ एप्रिल १६८० रोजी निधन झाले . शिवाजी महाराज नेहमी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जिवंत राहतील . जय हिंद जय शिवराय

 

ध्यान दें– प्रिय दर्शकों Essay on Shivaji Maharaj in Marathi (Article)आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करे

इस लेख के माध्यम से हमने Marathi Shivaji Maharaj Nibandh |  Shivaji Maharaj Nibandh Marathi का वर्णन किया है और आप यह निबंध नीचे दिए गए विषयों पर भी इस्तेमाल कर सकते है।

Shivaji Maharaj nibandh Marathi
Shivaji Maharaj par Marathi essay
Marathi Shivaji Maharaj par nibandh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *